ऐसे गावे गीत सुस्वरे
ऐसे गावे गीत सुस्वरे
तन मन व्हावे तल्लीन हो
मालकंस हा सुभग सूरमय
रसमय व्हावे जीवन हो
ऐसे गावे गीत सुस्वरे
राग सुरांचे साज लेवुनी
लय तालांची साथ घेवुनी
शब्दही यावे नटूनि थटूनि
अवचित व्हावे मीलन हो
सूर चेतना, सूर प्रेरणा
सूर प्रार्थना, सूर भावना
सुरेश्वराची सूर वंदना
सुखकर व्हावे अभिजन हो
कवी – श्री नितीन आखवे
गायिका – सौ आरती अंकलीकर – टिकेकर
संगीत – श्रीधर फडके