Monthly Archives: March 2022

एका गोरज घडीला

एका गोरज घडीला
चंद्र आणिला घरात
आणि काजळून गेले
सारे आकाश क्षणात

रातराणीचा सुगंध
साऱ्या गावात दाटला
कसा फांदी फांदीवरी
दंगा वाऱ्याने मांडला

तुझ्या स्वप्नील डोळ्यात
लक्ष चांदणी उत्सव
तुझ्या ओठांनी टिपले
माझ्या डोळ्यातील दव

मागे वळायचे नाही
रागे / धागे जोडायचे फुला
शुभ मुहूर्ताचे क्षणी
दिवा पाण्यात सोडला

कवी – अरुण सांगोळे
गायक – पं श्री सुरेश वाडकर
संगीत – श्रीधर फडके
ताल – दादरा

तेजोमय नादब्रह्म