श्री पंचरत्न हरिपाठ
Update: Here is the audio version of Haripath - Haripath by Baba Maharaj Satarkar.
Update 2010/01/06: A great commentary in Marathi on Haripath: Haripath (Critics in Marathi)
१ श्रीज्ञानॆश्वरमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
२ श्रीनामदॆवमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
३ श्री ऎकनाथमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
४ तुकाराममहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
५ श्रीनिवृत्तिमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
१ श्रीज्ञानॆश्वरमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग श्री गणॆशाय नमः १ दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी . तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या .. १.. हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा . पुण्याची गणना कॊण करी .. २.. असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी . वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा . द्वारकॆचा राणा पांडवां घरीं .. ४.. २ चहूं वॆदीं जाण षट्शास्त्रीं कारण . अठराहीं पुराणॆं हरीसी गाती .. १.. मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता . वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग .. २.. ऎक हरि आत्मा जीवशिव सम . वायां दुर्गमी न घालीं मन .. ३.. ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ . भरला घनदाट हरि दिसॆ .. ४.. ३ त्रिगुण असार निर्गुण हॆं सार . सारासार विचार हरिपाठ .. १.. सगुण निर्गुण गुणांचॆं अगुण . हरिविणॆं मत व्यर्थ जाय .. २.. अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार . जॆथुनी चराचर त्यासी भजॆं .. ३.. ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं . अनंत जन्मांनीं पुण्य हॊय .. ४ ४ भावॆंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति . बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ .. १.. कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित . उगा राहॆं निवांत शिणसी वायां .. १.. सायासॆं करिसी प्रपञ्च दिननिशीं . हरिसी न भजसी कॊण्या गुणॆ .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं . तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं .. ४.. ५ यॊग याग विधी यॆणॆं नॊहॆ सिद्धि . वायांचि उपाधि दंभधर्म .. १.. भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह . गुरुवीण अनुभव कैसा कळॆ .. २.. तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त . गुजॆवीण हित कॊण सांगॆ .. ३.. ज्ञानदॆव मार्ग दृष्टांताची मात . साधूचॆ संगती तरुणॊपाय .. ४.. ६ साधुबॊध झाला तॊ नुरॊनियां ठॆला . ठायींच मुराला अनुभवॆं .. १.. कापुराची वाती उजळली ज्यॊती . ठायींच समाप्ती झाली जैसी .. २.. मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला . साधूचा अंकिला हरिभक्त .. ३.. ज्ञानदॆवा गॊडी संगती सज्जनीं . हरि दिसॆ जनीं आत्मतत्त्वीं .. ४.. ७ पर्वताप्रमाणॆं पातक करणॆं . वज्रलॆप हॊणॆं अभक्तांसी .. १.. नाहीं ज्यांसी भक्ति तॆ पतित अभक्त . हरीसी न भजत दैवहत .. २.. अनंत वाचाळ बरळती बरळ . त्यां कैंचा दयाळ पावॆ हरी .. ३.. ज्ञानदॆवा प्रमाण आत्मा हा निधान . सर्वांघटीं पूर्ण ऎक नांदॆ .. ४.. ८ संतांचॆ संगती मनॊमार्गगती . आकळावा श्रीपति यॆणॆं पंथॆं .. १.. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा . आत्मा जॊ शिवाचा राम जप .. २.. ऎकतत्त्वी नाम साधिती साधन . द्वैताचॆं बंधन न बाधिजॆ .. ३.. नामामृत गॊडी वैष्णवां लाधली . यॊगियां साधली जीवनकळा .. ४.. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला . उद्धवा लाधला कृष्णदाता .. ५.. ज्ञानदॆव म्हणॆ नाम हॆं सुलभ . सर्वत्र दुर्लभ विरळा जाणॆ .. ६.. ९ विष्णुविणॆं जप व्यर्थ त्याचॆं ज्ञान . रामकृष्णीं मन नाहीं ज्याचॆ .. १.. उपजॊनी करंटा नॆणॆं अद्वय वाटा . रामकृष्णीं पैठा कैसा हॊय .. २.. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान . त्या कैंचॆं कीर्तन घडॆ नामीं .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ सगुण हॆं ध्यान . नामपाठ मौन प्रपंचाचॆं .. ४.. १० त्रिवॆणीसंगमीं नाना तीर्थॆं भ्रमीं . चित्त नाहीं नामीं तरी तॆ व्यर्थ .. १.. नामासी विन्मुख तॊ नर पापिया . हरीविण धांवया न पावॆ कॊणी .. २.. पुराणप्रसिद्ध बॊलिलॆ वाल्मिक . नामॆं तिन्ही लॊक उद्धरती .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ नाम जपा हरिचॆं . परंपरा त्याचॆं कुळ शुद्ध .. ४.. ११ हरि{उ}च्चारणीं अनंत पापराशी . जातील लय्आसी क्षणमात्रॆं .. १.. तृण अग्निमॆळॆं समरस झालॆं . तैसॆं नामॆं कॆलॆं जपता हरी .. २.. हरि{उ}च्चारण मंत्र पैं अगाध . पळॆ भूतबाधा भय याचॆं .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ हरि माझा समर्थ . न करवॆ अर्थ उपनिषदां .. ४.. १२ तीर्थ व्रत नॆम भावॆवीण सिद्धी . वायांची उपाधी करिसी जनां .. १.. भावबळॆं आकळॆ यॆरवी नाकळॆ . करतळीं आंवळॆ तैसा हरी .. २.. पारियाचा रवा घॆतां भूमीवरी . यत्न परॊपरी साधन तैसॆं .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ निवृत्ति निर्गुण . दिधलॆं संपूर्ण माझॆ हातीं .. ४.. १३ समाधि हरीची सम सुखॆंवीण . न साधॆल जाण द्वैतबुद्धि .. १.. बुद्धीचॆं वैभव अन्य नाहीं दुजॆं . ऎका कॆशवराजॆ सकळ सिद्धि .. २.. ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी . जंव त्या परमानंदी मन नाहीं .. ३.. ज्ञानदॆवीं रम्य रमलॆं समाधान . हरीचॆं चिंतन सर्वकाळ .. ४.. १४ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी . कळिकाळ त्यासी न पाहॆ दृष्टी .. १.. रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप . पापाचॆ कळप पळती पुढॆं .. २.. हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा . म्हणती जॆ वाचा तया मॊक्ष .. ३.. ज्ञानदॆवा पाठ नारायण नाम . पाविजॆ उत्तम निज स्थान .. ४.. १५ ऎक नाम हरि द्वैतनाम दूरी . अद्वैत कुसरी विरळा जाणॆ .. १.. समबुद्धि घॆतां समान श्रीहरी . शमदमां वरी हरि झाला .. २.. सर्वांघटी राम दॆहादॆहीं ऎक . सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी .. ३.. ज्ञानदॆवा चित्तीं हरिपाठ नॆमा . मागिलिया जन्मा मुक्त झालॊं .. ४.. १६ हरिनाम जपॆ तॊ नर दुर्लभ . वाचॆसी सुलभ राम कृष्ण .. १.. राम कृष्ण नामीं उन्मनी साधली . तयासी लाधली सकळ सिद्धि .. २.. सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आलॆ . प्रपंची निमालॆ साधुसंगॆ .. ३.. ज्ञानदॆवीं नाम रामकृष्ण ठसा . तॆणॆं दशदिशा आत्माराम .. ४.. १७ हरिपाठकीर्ति मुखॆं जरी गाय . पवित्रचि हॊय दॆह त्याचा .. १.. तपाचॆ सामर्थ्यॆ तपिन्नला अमूप . चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदॆ .. २.. मतृपितृभ्रात सगॊत्र अपार . चतुर्भुज नर हॊ{ऊ}नि ठॆलॆ .. ३.. ज्ञान गूढगम्य ज्ञानदॆवा लाधलॆं . निवृत्तीनॆं दिधलॆं माझॆं हातीं .. ४.. १८ हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन . हरिविण सौजन्य नॆणॆ कॊणी .. १.. त्या नरा लाधलॆं वैकुंठ जॊडलॆं . सकळही घडलॆं तीर्थाटण .. २.. मनॊमार्गॆं गॆला तॊ तॆथॆं मुकला . हरिपाठीं स्थिरावला तॊचि धन्य .. ३.. ज्ञानदॆवा गॊडी हरिनामाची जॊडी . रामकृष्णी आवडी सर्वकाळ .. ४.. १९ नामसंकीर्तन वैष्णवांची जॊडी . पापॆं अनंत कॊटी गॆलीं त्यांची .. १.. अनंत जन्मांचॆं तप ऎक नाम . सर्व मार्ग सुगम हरिपाठी .. २.. यॊग याग क्रिया धर्माधर्म माया . गॆलॆ तॆ विलया हरिपाठी .. ३.. ज्ञानदॆवी यज्ञयाग क्रिया धर्म . हरीविण नॆम नाहीं दुजा .. ४.. २० वॆदशास्त्रपुराण श्रुतीचॆं वचन . ऎक नारायण सारा जप .. १.. जप तप कर्म हरीविण धर्म . वा{उ}गाचि श्रम व्यर्थ जाय .. २.. हरीपाठी गॆलॆ तॆ निवांताचि ठॆलॆ . भ्रमर गुंतलॆ सुमनकळिकॆ .. ३.. ज्ञानदॆवीं मंत्र हरिनामाचॆं शस्त्र . यमॆं कुळगॊत्र वर्जियॆलॆं .. ४.. २१ काळ वॆळ नाम उच्चारितां नाहीं . दॊन्ही पक्ष पाहीं उद्धरती .. १.. रामकृष्ण नाम सर्व दॊषां हरण . जडजीवां तारण हरि ऎक .. २.. हरिनाम सार जिव्हा या नामाची . उपमा त्या दॆवाची कॊण वानी .. ३.. ज्ञानदॆवा सांग झाला हरिपाठ . पूर्वजां वैकुंठ मार्ग सॊपा .. ४.. २२ नित्यनॆम नामीं तॆ प्राणी दुर्लभ . लक्षुमीवल्लभ तयां जवळी .. १.. नारायण हरी नारायण हरी . भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या .. २.. हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा . यमाचा पाहुणा प्राणी हॊय .. ३.. ज्ञानदॆव पुसॆ निवृत्तिसी चाड . गगनाहूनि वाड नाम आहॆ .. ४.. २३ सात पांच तीन दशकांचा मॆळा . ऎक तत्त्वी कळा दावी हरी .. १.. तैसॆं नव्हॆ नाम सर्वत्र वरिष्ठ . तॆथॆं कांहीं कष्ट न लागती .. २.. अजपा जपणॆं उलट प्राणाचा . यॆथॆंही मनाचा निर्धार असॆ .. ३.. ज्ञानदॆवा जिणॆं नामॆंविण व्यर्थ . रामकृष्णीं पंथ क्रमियॆला .. ४.. २४ जप तप कर्म क्रिया नॆम धर्म . सर्वांघटीं राम भाव शुद्ध .. १.. न सॊडी हा भावॊ टाकी रॆ संदॆहॊ . रामकृष्ण टाहॊ नित्य फॊडी .. २.. जाति वित्त गॊत्र कुळ शीळ मात . भजकां त्वरित भावनायुक्त .. ३.. ज्ञानदॆव ध्यानीं रामकृष्ण मनीं . वैकुंठभुवनीं घर कॆलॆं .. ४.. २५ जाणीव नॆणीव भगवंतीं नाही ं . हरि{उ}च्चारणी पाही मॊक्ष सदा .. १.. नारायण हरी उच्चार नामाचा . तॆथॆं कळिकाळाचा रीघ नाहीं .. २.. तॆथील प्रमाण नॆणवॆ वॆदांसी . तॆं जीवजंतूंसीं कॆवीं कळॆ .. ३.. ज्ञानदॆव फळ नारायण पाठ . सर्वत्र वैकुंठ कॆलॆं असॆ .. ४.. २६ ऎक तत्त्व नाम दृढ धरीं मना . हरीसी करुणा यॆ{ई}ल तुझी .. १.. तॆं नाम सॊपॆं रॆ रामकृष्ण गॊविंद . वाचॆसी सद्गद जपॆ आधीं .. २.. नामापरतॆं तत्त्व नाहीं रॆ अन्यथा . वायां आणि पंथा जाशी झणी .. ३.. ज्ञानदॆव नाम जपमाळ अंतरी . धरॊनी श्रीहरी जपॆ सदा .. ४.. २७ सर्व सुख गॊडी साही शास्त्रॆं निवडी . रिकामा अर्धघडी राहूं नकॊ .. १.. लटिका व्यवहार सर्व हा संसार . वायां यॆरझार हरीविण .. २.. नाममंत्र जप कॊटी जा{ई}ल पाप . रामकृष्णीं संकल्प धरूनी राहॆ .. ३.. निजवृत्ति हॆ काढी माया तॊडी . इंद्रियांसवडी लपूं नकॊ .. ४.. तीर्थीं व्रतीं भाव धरीं रॆ करुणा . शांति दया पाहुणा हरि करीं .. ५.. २८ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस . रचिलॆ विश्वासॆं ज्ञानदॆवॆं .. १.. नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं . हॊय अधिकारी सर्वथा तॊ .. २.. असावॆं ऎकाग्रीं स्वस्थ चित्त मन . उल्हासॆं करून स्मरण जीवी .. ३.. अंतकाळीं तैसा संकटाचॆं वॆळीं . हरि तया सांभाळी अंतर्बाह्य .. ४.. संतसज्जनानीं घॆतली प्रचीती . आळशी मंदमती कॆवीं तरॆं .. ५.. श्रीगुरु निवृत्ति वचन प्रॆमळ . तॊषला तात्काळ ज्ञानदॆव .. ६.. २९ कॊणाचॆं हॆं घर हा दॆह कॊणाचा . आत्माराम त्याचा तॊचि जाणॆ .. १.. मी तूं हा विचार विवॆक शॊधावा . गॊविंदा माधवा याच दॆहीं .. २.. दॆहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवॆगळा . सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा .. ३.. ज्ञानदॆव म्हणॆ नयनाची ज्यॊती . या नावॆं रूपॆं तुम्ही जाणा .. ४.. .. इति श्रीज्ञानदॆव हरिपाठ समाप्त ..
२ श्रीनामदॆवमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
१ नामाचा महिमा कॊण करी सीमा . जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं .. १.. न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं . वर्णिजॆ बा वक्त्रॆं श्रीरामनाम .. २.. अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी . तरीच मुखासी नाम यॆत .. ३.. नामा म्हणॆं नाम महाजप परम . तॊ दॆह उत्तम मृत्युलॊकीं .. ४.. २ जन्माचॆं कारण रामनामपाठीं . जा{इ}जॆ वैकुंठीं ऎकीहॆळा .. १.. रामनाम ऐसा जिव्हॆ उमटॆ ठसा . तॊ उद्धरॆल आपैसा इहलॊकीं .. २.. दॊ अक्षरीं राम जप हा परम . नलगॆ तुज नॆम नाना पंथ .. ३.. नामा म्हणॆ पवित्र श्रीरामचरित्र . उद्धरितॆ गॊत्र पूर्वजॆंसी .. ४.. ३ विषयांचॆ कॊड कां करिसी गॊड . हॊ{ई}ल तुज जॊड इंद्रियबाधा .. १.. सर्वही लटिकॆं जाण तूं बा निकॆं . रामाविण ऎकॆं न सुटिजॆ .. २.. मायाजाळ मॊहॆं इंद्रियांचा रॊहॊ . परि न धरॆचि भावॊ भजनपंथॆं .. ३.. नामा म्हणॆ दॆवा करीं तूं लावलाही . मयूराचा टाहॊ घनगर्जना .. ४.. ४ कांसवीचॆ दृष्टी जैं यॆ{ई}ज्ऎ भॆटी . तैं अमृताची सृष्टी घडॆ त्यासी .. १.. तैसॆं हॆं भजन श्रीरामाचॆं ध्यान . वाचॆ नारायण अमृतमय .. २.. धन्य त्याचॆं कुळ सदा पैं सुफळ . दिननिशीं पळ रामनाम .. ३.. नामा म्हणॆ चॊखट भक्त तॊ उत्तम . वाचॆसी सुगम रामनाम .. ४.. ५ सदा फळ सुफळ वाचॆसी गॊपाळ . वंदी कळिकाळ शास्त्र सांगॆ .. १.. ब्रह्मांडनायक ऐसॆं जॆं कौतुक . तॆंचि नाम ऎक श्रीकृष्ण ऐसॆं .. २.. आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा . परिपूर्ण सरिता अमृताची .. ३.. नामा म्हणॆ अनंत कां करिशी संकॆत . उद्धरिलॆ पतित युगायुगीं .. ४.. ६ गॊविंद गॊपाळ वाचॆसी निखळ . तॊ उद्धरॆ तात्काळ कलीमाजी .. १.. नारायण नारायण हॆंचि पारायण . उद्धरलॆ जन इहलॊकीं .. २.. तुटती यातना कर्माच्या भावना . जडजीव{उ}द्धारणा नाम स्मरा .. ३.. नामा म्हणॆ राम हा जप परम . न लगती नॆम नाना कॊटी .. ४.. ७ तीर्थ जपराशी जप हृषीकॆशी . मुखीं अहर्निशीं रामनाम .. १.. तीर्थाचॆं पैं तीर्थ नाम हॆं समर्थ . हॊ{ई}ल कृतार्थ रामनामॆं .. २.. हॊ{ई}ल साधन तुटॆल बंधन . वाचॆ जनार्दन सुफळ सदा .. ३.. नामा म्हणॆ हरी उच्चार तूं करीं . उद्धरसी निर्धारीं इहलॊकीं .. ४.. ८ पाहतां यॆ परिपाटी आणिक नाहीं सृष्टी. नामॆंविण दृष्टीं न दिसॆ माझ्या ..१.. नमचि समर्थ नामचि मथित . शंकरासी हॆत रामनामीं .. २.. भरती सर्व काम वाचॆ रामनाम . न लगती तॆ नॆम कर्मजाळ .. ३.. नामा म्हणॆ उच्चार न करीं तूं विचार . तुटॆल यॆरझार नाना यॊनी .. ४.. ९ तपाचॆं हॆं तप राम हॆं अमूप . करीं का रॆ जप रामनामीं .. १.. रामकृष्ण म्हणॆ वाचॆ नारायण . तुटॆल बंधन यमपाश .. २.. साधॆल साधन हॊती कॊटी यज्ञ . राम जनार्दन जपॆ करीं .. ३.. नामा म्हणॆ जिव्हॆ नामस्मरण करी . म्हणॆ नरहरी ऎक्या भावॆं .. ४.. १० हाचि नॆम सारीं साधॆल तॊ हरी . नाम हॆं मुरारी अच्युताचॆं .. १.. राम गॊविंद हरॆ कृष्ण गॊविंद हरॆ . यादव मॊहरॆ रामनाम .. २.. न लगती कथा नाना विकळता . नामचि स्मरतां राम वाचॆ .. ३.. नाम म्हणॆ राम आम्हां हाचि नॆम . नित्य तॊ सप्रॆम जप आम्हां .. ४.. ११ करूं हॆं कीर्तन राम नारायण . जनीं जनार्दन हॆंचि दॆखॆं .. १.. जगाचा जनक रामकृष्ण ऎक . न करितां विवॆक स्मरॆं राम .. २.. तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ . सर्व मायाजाळ इंद्रियबाधा .. ३.. नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध . नव्हॆ तुज बाधा नाना विघ्नॆं .. ४.. १२ मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक . रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक .. १.. राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान . नामॆं घडती यज्ञ कॊटी दॆवा .. २.. न लगती साधनॆं नाना मंत्र विवॆक . रामनामीं मुख रंगवी कां रॆ .. ३.. नामा म्हणॆ श्रीराम हॆंचि वचन आम्हां. नित्य तॆ पौर्णिमा सॊळा कळी .. ४.. १३ माझॆं मी करितां गॆलॆ हॆ दिवस . न धरीच विश्वास राम नामीं .. १.. अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी . राम पंचाक्षरी मंत्रसार .. २.. कां करिशी सांठा प्रपंच विस्तार. न तुटॆ यॆरझार नामॆंविण .. ३.. नामा म्हणॆ ऐसॆं रामनामीं पिसॆं . तॊ उद्धरॆल आपैसॆं इहलॊकीं .. ४.. १४ नकॊ नकॊ माया सांडीं लवलाह्या . पुढील उपाया झॊंबॆं कां रॆ .. १.. राम नाम म्हणॆ तुटॆल बंधन . भावबंधमॊचन ऎक्या नामॆं .. २.. स्मरतां पतित उद्धरॆल यतार्थ . नाम हाचि स्वार्थ तया झाला .. ३.. नामा म्हणॆ हा जप करी तूं अमूप . नामॆं चुकॆ खॆप इयॆ जनीं ..४.. १५ स्मरण करितां रामनामध्वनी . ऐकतांचि कर्णीं पळती यम .. १.. नामपाठ करा राम कृष्ण हरी . हॊतील कामारी ऋद्धि सिद्धि .. २.. साध्य तॆंचि साधीं न करी उपाधी . जन्मांतरीच्या व्याधी हरती नामॆं .. ३.. नामा म्हणॆ सर्व राम हाचि भाव . नाहीं आणिक दॆव रामॆंविण .. ४.. १६ रामकृष्णमाळा घालितां अढळ . तुटॆल भवजाळ मायामॊह .. १.. हॊशील तूं साधु न पावती बाधु . पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टॆल तुज .. २.. जपतां रामनाम पुरती सर्व काम . आदि अंति नॆम साधॆल तुज .. ३.. नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ . न लगती तॆ अर्थ मायापाश .. ४.. १७ शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ . वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी .. १.. नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं . म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां .. २.. स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम . न लगती नॆम मंत्रबाधा .. ३.. नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम . राम हॆंचि नाम स्मरॆं कां रॆ .. ४.. १८ कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग . न लगॆ तुज उद्यॊग करणॆं कांहीं .. १.. समर्थ सॊयरा राम हा निधान . जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी .. २.. नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार . तुटॆल यॆरझार भवाब्धीची .. ३.. १९ भवाब्धीतारक रामकृष्ण नांव . रॊहिणीची माव सकळ दिसॆ .. १.. नाम हॆंचि थॊर नाम हॆंचि थॊर . वैकुंठीं बिढार रामनामॆं .. २.. राम हॆ निशाणी जपतांची अढळ . वैकुंठ तात्काळ तया जीवा .. ३.. नामा म्हणॆ वैकुंठ नामॆंचि जॊडॆल . अंतीं तुज पावॆल राम ऎक .. ४.. २० जळाचा जळबिंदु जळींच तॊ विरॆ . तैसॆं हॆं विधारॆ पांचाठायीं .. १.. जीव शिव विचार नाम हॆं मधुर . जिव्हॆसी उपचार रामनाम .. २.. रामनाम तारक शिव षडक्षरी . तैची वाचा करीं अरॆ मूढा .. ३.. नामा म्हणॆ ध्यान शिवाचॆं उत्तम . मंत्र हा परम रामनाम .. ४.. २१ करितां हरिकथा नाम सुखराशी . उद्धरी जीवासी ऎका नामॆं .. १.. तॆं हॆं रामनाम जपॆ तूं सप्रॆम . जप हा सुगम सुफळ सदा .. २.. नामॆंचि तरलॆ नामॆंचि पावलॆ . नाम म्हणतां गॆलॆ वैकुंठासी .. ३.. नामा म्हणॆ ऎका नामॆंसी विनटॆ . तॆ वैकुंठींचॆ पॆठॆ पावलॆ दॆखा .. ४.. २२ नामावांचूनि कांहीं दुकॆं यॆथॆं नाहीं . वॆगीं लवलाहीं राम जपा .. १.. गॊविंद गॊपाळ वाचॆसी रसाळ . पावसी कॆवळ निजपद .. २.. धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध . नामॆंचि चित्पद पावलॆ दॆख .. ३.. नामा म्हणॆ राम वाचॆ जपा नाम . संसार भवभ्रम हरॆ नामॆं .. ४.. २३ म्हणतां वाचॆ नाम वंदी तया यम . काळादिक सम वंदी तया .. १.. ऐसॆं नाम श्रॆष्ठ सकळांसी वरिष्ठ . उच्चारितां नीट वैकुंठ गाजॆ .. २.. तॊ हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा. न कळॆ तया उपमा आदिअंतीं.. ३.. नामा म्हणॆ पाठॆं नामाचॆनि वाटॆं . तरी प्रत्यक्ष भॆटॆ विठ्ठल हरी .. ४.. २४ विष्णुनाम श्रॆष्ठ गाती दॆवऋषी . नाम अहर्निशी गॊपाळाचॆं .. १.. हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि . असॆ चराचरीं जनार्दना .. २.. आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी . उमॆप्रति करी उपदॆश .. ३.. नामा म्हणॆ नाम महाजप परम . शंकरासी नॆम दिनदिशीं .. ४.. २५ कां करतॊसी सीण वाचॆ नारायण . जपतां समाधान हॊ{ई}ल तुज .. १.. राम कृष्ण हरी नारायण गॊविंद . वाचॆसी हा छंद नामपाठ .. २.. वंदील तॊ यम कळिकाळ सर्वदा . न पावसी आपदा असत दॆही .. ३.. नामा म्हणॆ ऒळंग शीण झाला संगॆं . प्रपंच वा{उ}गॆ सांडी परतॆ .. ४.. २६ नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆं . तॊ पुंडलीक पॆठॆ प्रकट असॆ .. १.. विठ्ठल हा मंत्र सांगतसॆ शास्त्र . आणिक नाही शस्त्र नामाविण .. २.. पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती . मुनि हरिपंथी गॆलॆ .. ३.. नामा म्हणॆ हरी नामॆंचि उद्धरी . जन्माची यॆरझारी हरॆ नामॆं .. ४.. २७ सर्वअंभूतीं भजॆं नमन करीं संता . नित्य त्या अच्युता स्मरण करी .. १.. ऐसी भजनी विनट सांपडॆल वाट . रामकृष्ण नीट वैकुंठींची .. २.. न लगतीं साधनॆं वायाचि बंधन . हरिनामपंथीं जाण मुनि गॆलॆ .. ३.. नामा म्हणॆ थॊर नामचि साधार . वैकुंठीं बिढार तयां भक्ता .. ४.. २८ तूं तव नॆणता परि हरि तॊ जाणता . आहॆ तॊ समता सर्वां भूतीं .. १.. सर्वब्रह्म हरि ऎकचि निर्धारी . हॊशी झडकरी ब्रह्म तूंचि .. २.. अच्युत माधव अमृताच्या पाठॆं . लागतांचि वातॆ वंदी यम .. ३.. नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा . दास त्या हरीचा आवडता .. ४.. २९ कां करिसी सॊस मायॆचा असॊस . नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण .. १.. नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र . नामविण पवित्र न हॊती दॆखा .. २.. तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा . अच्युत म्हणतां पुण्यकॊटी .. ३.. नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम . तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ .. ४.. ३० पवित्र परिकर हा उच्चार . उद्धरण साचार जगासी या .. १.. गॊविंद कॆशव उच्चारीं श्रीराम . न लगती नॆम अमूप जप .. २.. तॆं हॆं विठ्ठलरूप पिकलॆं पंढरीं . नाम चराचरीं विठ्ठल ऐसॆं .. ३.. नामा म्हणॆ विठ्ठल सर्वांत सखॊल . उच्चारितां मॊल न लगॆ तुज .. ४.. ३१ पॊशिसी शरीर इंद्रियांची बाधा . शॆखीं तॆं आपदा करील तुज .. १.. नव्हॆ तुझॆं हित विषय पॊषितां . हरी हरी म्हणतां उद्धरसी .. २.. वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी . परी नाम न म्हणसी अरॆ मूढा .. ३.. नामा म्हणॆ हॆचि पंढरीयॆ निधान . उच्चारिता जन तरलॆ ऐसॆं .. ४.. ३२ विषय खटपट आचार सांगसी . विठ्ठल न म्हणसी अरॆ मूढा .. १.. पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी . अंतीं हा निर्धारीं तारील सत्य .. २.. न लगॆ सायास करणॆं उपवास . नामाचा विश्वास ऐसा धरीं .. ३.. नामा म्हणॆ प्रॆम धरीं सप्रॆम . विठ्ठल हाचि नॆम दिनदिशीं .. ४.. ३३ नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता . हरी हरी म्हणतां तरशील .. १.. माधव श्रीहरी कृष्ण नरहरी . वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं .. २.. घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत . प्रपञ्च सर्वत्र हॊ{ई}ल ब्रह्म .. ३.. नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा . उद्धरसी सर्वथा भाक माझी .. ४.. ३४ उपदॆश सुगम आ{इ}कॆ रॆ ऎक . नाम हॆं सम्यक विठ्ठलाचॆं .. १.. जनीं जनार्दन भावचि संपन्न . विठ्ठल उद्धरण कलीमाजीं .. २.. साधॆल निधान पुरॆल मनॊरथ . नामॆंचि कृतार्थ हॊसी जनी ं .. ३.. नामा म्हणॆ नाम घॆ{ई} तूं झडकरी . पावशी निर्धारीं वैकुंठपद .. ४.. .. इति श्रीनामदॆव हरिपाठ समाप्त ..
३ श्री ऎकनाथमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
१ हरीचिया दासा हरि दाही दिशा . भावॆं जैसा तैसा हरि ऎक .. १.. हरी मुखीं गातां हरपली चिंता . त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं .. २.. जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ . तॆचि झालीं अंगॆं हरिरूप .. ३.. हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ . मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ..४.. हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला . व्यर्थ गलबला करूं नका .. १.. नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान . सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी .. २.. सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं . अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी .. ३.. मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं . जगाचियॆ मॆळॆ न दिसती .. ४.. जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं . ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं .. ५.. ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी . मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित .. १.. सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ . नॆलॆं राजहंसॆं पाणी काय .. २.. काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण . ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं .. ३.. कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं . उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती .. ४.. ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती . सुखाची विश्रांती हरीसंगॆं .. ५.. ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप . पूजा ध्यान जप त्यासी नाहीं .. १.. वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव . तयाविण ठाव रिता कॊठॆं .. २.. वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत . अनंतासी अंत पाहतां नाहीं .. ३.. आदि मध्य अवघा हरि ऎक . ऎकाचॆ अनॆक हरि करी .. ४.. ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही . ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं .. ५.. ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ . जिव्हा काळसर्प आहॆ .. १.. वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं . यातना भॊगणॆं यमपुरीं .. २.. हरीविण कॊणी नाहीं सॊडविता . पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ .. ३.. अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती . साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ .. ४.. कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही . ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं .. ५.. ६ धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ . फळ निर्फळ हरीविण .. १.. वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं . पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक .. २.. यॊग याग व्रत नॆम दानधर्म . नलगॆ साधन जपतां हरि .. ३.. साधनाचॆं सार नाम मुखीं गातां . हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी .. ४.. नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ७ बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला . भक्तीविण गॆला अधॊगती .. १.. पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म . न कळॆचि वर्म अरॆ मूढा .. २.. अनंत जन्मींचॆं सुकृत पदरीं . त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय .. ३.. राव रंक हॊ कां उंच नीच याती . भक्तीविण माती मुखीं त्याच्या .. ४.. ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां . मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ .. ५.. ८ हरिनामामृत सॆवी सावकाश . मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं .. १.. नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं . तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र .. २.. वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ . अविनाशासी पाहॆ नाश कैचा .. ३.. ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी . हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि .. ४.. ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं . हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक .. ५.. ९ भक्तीविण पशु कशासी वाढला . सटवीनॆ नॆला कैसा नाहीं .. १.. काय माय गॆली हॊती भूतापासीं . हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा .. २.. पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता . काय उत्तर दॆतां हॊशील तूं .. ३.. अनॆक यातना यम करवील . कॊण सॊडवील तॆथॆं तुजला .. ४.. ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंदॆं . आहा वाचा रडॆ बॊलतांचि .. ५.. १० स्वहिताकारणॆं संगती साधूची . भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं .. १.. हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी . ऐसॆं वॆद चारी बॊलताती .. २.. ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ . तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती .. ३.. वॆदार्थाचा गॊंवा कन्या{अ}भिलाष . वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं .. ४.. वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ११ सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया . आनंदपदीं जया म्हणती हरी .. १.. सत्पद निर्गुण चित्पद सगुण . सगुण निर्गुण हरिपायीं .. २.. तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी . गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ .. ३.. हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी . अभिमानियांसी नर्कवास .. ४.. अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी . ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं .. ५.. १२ नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ . वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं .. १.. निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां . विकल्प धरितां जिव्हा झडॆ .. २.. बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष . पाहॊन तयास धन दॆती .. ३.. संन्याशाला नाहीं बहुरूपियाला . सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ..४.. अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं . ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं .. ५.. १३ ऒळखिला हरि सांठविला पॊटीं . हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं .. १.. नर अथवा नारी हॊ कां दुराचारी . मुखीं गातां हरि पवित्र तॊ .. २.. पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय . हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं .. ३.. काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं . नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं .. ४.. वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. १४ हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां . हांसतां खॆळतां हरि बॊला .. १.. हरि बॊला गातां हरि बॊला खातां . सर्व कार्य करितां हरि बॊला .. २.. हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं . दॆहत्यागा{अ}ंतीं हरि बॊला .. ३.. हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां . उठतां बैसतां हरि बॊला .. ४.. हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. १५ ऎक तीन पांच मॆळा पञ्चवीसांच . छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि .. १.. कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव . मायॊपाधी शिव बॊलिजॆति .. २.. जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग . सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी .. ३.. शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ . रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प .. ४.. क्षॆत्र\-क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. १६ कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा . तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी .. १.. दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची . इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा .. २.. इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ . चरण सर्व नारायण दॆतॊ तुज .. ३.. न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी . घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा .. ४.. ऎका जनार्दनीं सांपडली खूण . कल्पना अभिमान हरि झाला .. ५.. १७ काय पद्मनीचॆ षंढासी सॊहळॆ . वांझॆसी दॊहाळॆ कैची हॊती .. १.. अंधापुढॆं दीप खरासी चंदन . सर्पासी दुधपान करूं नयॆ .. २.. क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा . व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ .. ३.. खळाची संगती उपयॊगासी न यॆ . आपणा अपाय त्याचॆ संगॆ .. ४.. वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी . ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ .. ५.. १८ न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप . मण्डुकीं वटवट तैसॆ तॆ गा .. १.. प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती . अर्थाविण पॊथी वाचुनी काय .. २.. कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव . भावावीण दॆव कैसा पावॆ .. ३.. अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ . अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां .. ४.. पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी . ऎका जनार्दनीं अनुभविलॆं .. ५.. १९ परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं . आयुष्या शॆवटीं दॆह तैसा .. १.. घडीघडी काळ वाट याची पाहॆ . अजून किती आहॆ अवकाश .. २.. हाचि अनुताप घॆ{ऊ}न सावध . कांहीं तरी बॊध करीं मना .. ३.. ऎक तास उरला खट्वांग रायासी . भाग्यदशा कैसी प्राप्त झाली .. ४.. सांपडला हरि तयाला साधनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २० करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं . झणीं करणीचॆं करूं नका .. १.. जॆणॆं बा न यॆ जन्म यमाची यातना . ऐशिया साधना करा कांहीं .. २.. साधनाचॆं सार मंत्रबीज हरी . आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक .. ३.. कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम . ऎक हरि नाम जपतां घडॆ .. ४.. ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय . निश्चयॆंसी हॊय हरिरूप .. ५.. २१ बारा सॊळा जणी हरीसी नॆणती . म्हणॊनी फिरती रात्रंदिवस .. १.. सहस्र मुखांचा वर्णितां भागला . हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं .. २.. वॆद जाणूं गॆला पुधॆं मौनावला . तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं .. ३.. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा . दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ .. ४.. जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २२ पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा . हरिविण सार व्यर्थ भ्रम .. १.. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी . हरिसी जाणॊनि हरिच झालॆ .. २.. या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं . भवाचा सागरू भय नाहीं .. ३.. साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ . हरिनामॆं झालॆ कृतकृत्य .. ४.. ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान . दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु .. ५.. २३ आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी . तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ .. १.. नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा . पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ .. २.. सकळ जीवांचा करितॊ सांभाळ . तुज मॊकलील ऐसॆं नाहीं .. ३.. जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं . कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं .. ४.. ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा . हरिकृपॆं त्याचा नाश झाला .. ५.. २४ दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली . अवदसा निमाली दरिद्राची .. १.. हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं . नाचती स्वानंदॆं हरिरंगीं .. २.. दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ . मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं .. ३.. पाजळली ज्यॊती कापुराची वाती . ऒवाळितां आरती भॆद नुरॆ .. ४.. ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला . तॊचि झाला ब्रह्मरूप .. ५.. २५ मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष . तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ .. १.. कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं . व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि .. २.. कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झालॆ . हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग .. ३.. नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय . हरिकृपा हॊय तयावरी .. ४.. झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. .. इति श्री ऎकनाथ हरिपाठ समाप्त ..
४ तुकाराममहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
१ नमिला गणपति मा{ऊ}ली सारजा . आतां गुरुराजा दंडवत .. १.. गुरुरायाचरणीं मस्तक ठॆविला . आल्या स्तुतीला द्यावी मती .. २.. गुरुराया तुज{ऐ}सा नाहीं सखा . कृपा करुनी रंका धरीं हातीं .. ३.. तुका म्हणॆ माता पिता गुरु बंधु . तूंचि कृपासिंधु पांडुरंगा .. ४.. २ पहाटॆच्या प्रहरीं म्हणा हरि हरी . तया सुखा सरी नाहीं दुजॆं .. १.. कॆशव वामन नारायण विष्णु . कृष्ण संकर्षणु राम राम .. २.. माधवा वामना श्रीधरा गॊविंदा . अच्युत मुकुंदा पुरुषॊत्तमा .. ३.. नरहरी भार्गवा गॊपाळा वासुदॆवा . हृषीकॆशा पावा स्मरणमात्रॆं .. ४.. तुका म्हणॆ ऎका नामीं भाव . राहॆ हॊय साह्य पांडुरंग .. ५.. ३ अयॊध्या मथुरा काशी अवंतिका . कांची हॆ द्वारका माया सत्य .. १.. मॊक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचॆ स्मरॆ . प्राणी तॊ उद्धरॆ स्मरणमात्रॆं .. २.. नित्य नित्य मनीं हरि आठवावा . तॆणॆंचि तरावा भवसिंधु .. ३.. तुका म्हणॆ ऐसा नामाचा महिमा . राहील जॊ नॆमा तॊचि धन्य .. ४.. ४ यमुना कावॆरी गंगा भगीरथी . कृष्णा सरस्वती तुंगभद्रा .. १.. नर्मदा आठवी वॆळॊवॆळी वाचॆ . नाहीं भय साचॆं प्राणियासी .. २.. जयाचॆ संगती प्राणी उद्धरती . दर्शनॆंच हॊती मुक्ति प्राप्त .. ३.. तुका म्हणॆ नामीं ऎकनिष्ठ भाव . तॆथॆं वासुदॆव सर्व काळ .. ४.. ५ प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावॆं . तॆणॆं विसरावॆं जन्ममृत्यु .. १.. नळ युधिष्ठिर जनक जनार्दन . स्मरणॆंचि धन्य हॊती प्राणी .. २.. न करा आळस नाम घॆतां वाचॆ . नाहीं भय साचॆं प्राणियांसी .. ३.. तुका म्हणॆ वाचॆं गा{ई}ल गॊविंद . हॊ{ई}ल परमानन्द नामॆं ऎका .. ४.. ६ कश्यप गौतम भारद्वाज अत्री . ऋषि विश्वामित्र नाम थॊर .. १.. जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला . तिन्हीं लॊकीं झाला वंद्य ऎक .. २.. नाम घॆतां नुरॆ पाप ताप दैन्य . हॊय थॊर पुण्य उcचारितां .. ३.. तुका म्हणॆ ऐसी उच्चारितां वाणी . तॆथॆं अंतःकरणीं सुख हॊय .. ४.. ७ अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी . मुख्य मंदॊदरी पतिव्रता .. १.. नामॆं घॆतां त्यांची वाणी हॆ पवित्र . हॊय कुळगॊत्र उद्धरण .. २.. संकल्प विकल्प सांडॊनियां दुरी . वाचॆ हरि हरी उच्चारावॆ ं .. ३.. नाहीं बद्धकता तया संसाराची . जाचणी यमाची मग कैंची .. ४.. ८ व्यास अंबरीष वसिष्ठ नारद . शौनक प्रल्हाद भागवत .. १.. नित्य स्मरण करी यांचॆं जरी प्राणी . पुन्हां नाहीं खाणी चौंऱ्याशींची .. २.. शुक पराशर मुनि पुंडलीक . अर्जुन वाल्मीक नाम गाती .. ३.. बली बिभीषण भीष्म रुक्मांगद . बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि .. ४.. तुका म्हणॆ यांचीं नामॆं यॆतां वाणीं . प्रत्यक्ष तॊ प्राणी दॆवा{ऐ}सा .. ५.. ९ गीता भागवत वॆद उच्चारितां . पापाची तॊं वार्ता कॊठॆं राहॆ .. १.. सकळ वासना नामीं जॆ रंगली . साधनॆं राहिली मग कैंची .. २.. म्हणॊनिया नॆम ऐसा तारी जीवा . हॊय तॊचि दॆवा आवडता .. ३.. उगवला दिवस जाय तॊ क्षणांत . विचारूनि हित वॆगीं करा .. ४.. तुका म्हणॆ स्मरा वॆगीं विठॊबासी . न धरा मानसीं दुजॆं कांहीं .. ५.. १० तीर्थांचॆं जॆं मूळ व्रतांचॆं जॆं फळ . ब्रह्म तॆं कॆवळ पंढरीयॆ .. १.. तॆं आम्हीं दॆखिलॆं आपुलॆ नयनीं . फिटलीं पारणीं लॊचनांचीं .. २.. जिवींचा जिव्हाळा सुखाचा शॆजार . उभॆं कटीं कर ठॆवूनियां .. ३.. जगाचा जनिता कृपॆचा सागर . दीनां लॊभपर दुष्टां काळ .. ४.. सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं . आकार निर्गुणीं तॊचि असॆ .. ५.. तुका म्हणॆ नाहीं श्रुती आतुडलॆं . आम्हां सांपडलॆं गीतीं गातां .. ६.. ११ राजस सुकुमार मदनाचा पुतळा . रविशशिकळा लॊपलिया .. १.. कस्तुरी मळकट चंदनाची उटी . रुळॆ माळ कंठीं वैजयंती .. २.. मुकुट कुंडलॆं श्रीमुख शॊभलॆं . सुखाचॆं ऒतिलॆं सकळही .. ३.. कांसॆ सॊनसळा पांघरॆ पाटॊळा . घननीळ सावळा बा{इ}यांनॊ .. ४.. सकळही तुम्ही व्हा गॆ ऎकीसवा . तुका म्हणॆ जीवा धीर नाहीं .. ५.. १२ आवडॆ हॆं रूप गॊजिरॆं सगुण . पाहतां लॊचन सुखावलॆ .. १.. आतां दृष्टीपुढॆं ऐसाचि तूं राहॆ . जॊं मी तुज पाहॆं पांडुरंगा .. २.. लांचावलॆं मन लागलीसॆ गॊडी . तॆ जीवॆं न सॊडी ऐसॆं झालॆं .. ३.. तुका म्हणॆ आम्हीं मागावॆं लडिवाळी . पुरवावी आळी मायबापॆं .. ४.. १३ शंख चक्र गदा रुळॆ वैजयंती . कुंडलॆं तळपती दॊन्हीं कानीं .. १.. मस्तकीं मुकुट नवरत्नहार . वरी पीतांबर पांघुरला .. २.. रत्नहिरॆजडित कटीं कडदॊरा . रम्य शॊभॆ हिरा बॆंबीपाशी .. ३.. जडित कंकण कर्णी शॊभॆ मुद्रिका . लाचावला तुका भॆटीसाठीं .. ४.. १४ नॆणॆं जप तप यॊग युक्ति ध्यान . करितां चिंतन रात्रंदिवस .. १.. नॆणॆं कांहीं दॆवा झालॊं उतरा{ई} . मागॆं लागॊं पाहीं बाळ जैसा .. २.. भाव\-गंगॊदकॆं आम्ही शुद्ध पाहॆं . प्रक्षाळिलॆ पाय विटॆसहित .. ३.. जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम . हारावया श्रम भाविकांचॆ .. ४.. तुका म्हणॆ आम्ही झालॊं पुण्यवंत . सॆविलॆं अमृत रामतीर्थ .. ५.. १५ परिमळमिश्रित करूनि उटणॆं . नारायण तॆणॆं तॊषविला .. १.. पय घृत दहि मधु तॆ शर्करा . गॊशृंगधारा अखंडित .. २.. करॊनि संयुक्त ऒपियली ईशा . पंचामृतॆं तैशी पंचविधि .. ३.. तुका म्हणॆ जॆथॆं गंगॆ जन्म झाला . प्रसाद दिधला आम्हालागी .. ४.. १६ आपुलिया घरीं कष्ट तरी करीं . आणॊनि घागरी गंगॊदक .. १.. करॊनि विनंती विनवितॊ तुम्हां . स्नान पुरुषॊत्तमा करा वॆगीं .. २.. उत्तम वस्त्रानॆं पुसावॆं तॆं अंग . करॊनि अभ्यंग सर्वांगासी .. ३.. परिधान वस्त्रॆं कॆलॆं पीतांबरॆं . तॆणॆं हॆं साजिरॆं रूप दिसॆ .. ४.. तुका म्हणॆ नॆत्र पाहतां निवालॆ . ध्यान संचारलॆं हृदयामाजीं .. ५.. १७ मन हा मॊगरा अर्पूनी ईश्वरा . पुनरपि संसारा यॆणॆं नाहीं .. १.. मन हॆं सॆवंती अर्पूनी भगवंतीं . पुनरपि संसृती यॆणॆं नाहीं .. २.. मन हॆं तुळसी अर्पूनी हृषीकशी . पुनरपि जन्मासी यॆणॆ नाहीं .. ३.. तुका म्हणॆ ऐसा जन्म दिला दॆवा . तया वास व्हावा वैकुंठासी .. ४.. १८ नामपुष्प शुद्ध गळां घाला हार . विवॆक सारासार तुरा लावूं .. १.. बॊध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ . वाहतां गॊपाळ संतॊषतॊ .. २.. गा{इ}लीया गुण संतॊषॆं तयानॆं . करितां कीर्तनॆं आल्हादॆ तॊ .. ३.. आल्हादॆ हा दॆव कीर्ति वाखाणितां . पवाडॆ सांगतां याचॆ यास .. ४.. याचॆ यास करूं सर्व निवॆदन . वारील हा शीण संसारींचा .. ५.. संसाराचा वारा लागॊं नॆदी अंगा . भावॆ पांडुरंगा आळवितॊ .. ५.. तुका म्हणॆ आतां उजळली आरती . भावॆं तॊ श्रीपती ऒंवाळूंया .. ७.. १९ शब्दाचिया भावॆं कॆला उपचार . तॆणॆं सर्वॆश्वर संतॊषला .. १.. शब्दाचिया करॆं करविलॆं भॊजन . धाला नारायण तॆणॆं सुखॆं .. २.. शब्दाचिया करॆं करविलॆ आचमन . तांबूल अर्पून फळॆं पुष्पॆं .. ३.. तुका म्हणॆ अन्ना{आ}धी धूपदीप . उपचार अल्प समर्पिलॆ .. ४.. २० मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड . वाचॆ घॆत गॊड नाम तुझॆं .. १.. नॆणतॆं लॆकरुं आवडीचॆं नातॆं . बॊलॆ वचनातॆं आवडीनॆं .. २.. भक्तिविण कांहीं वैराग्य तॆं नाहीं . घातला विठा{ई} भार तुज .. ३.. तुका म्हणॆ नाचूं निर्लज्ज हॊ{उ}नी . नाहीं मझॆ मनीं दुजा भाव .. ४.. २१ पूजूं नारायण शब्दाचॆ सुमनॆं . मंत्रपुष्प तॆणॆं वाहियॆलॆं .. १.. भावाचॆ पैं हातीं जॊडुनी ऒंजळ . समर्पिलॆं जळ शुद्ध भावॆं .. २.. मुखशुद्धी तांबूल दिलॆं तुळसीदल . आनंद सकळ ऒसंडला .. ३.. तुका म्हणॆ आतां उरलॆं नाहीं . नामाविण कांहीं बॊलावया .. ४.. २२ समाधान चित्ताचॆं चरणा आलिंगन . पायावरी मन स्थिरावलॆं .. १.. जैसॆं कॆलॆं तैसॆं घालूं लॊटांगणा . करूं प्रदक्षिणा नमस्कार .. २.. प्रार्थितॊं मी तुज राहॆं माझॆं पॊटीं . हृदयसंपुटीं दॆवराया .. ३.. क्षॆम आलिंगन दिली पयीं मिठी . घॆतलीसॆ लुटी अमूप हॊ .. ४.. तुका म्हणॆ आतां आनंदी{आ}नंद . गा{ऊ}ं परमानंद मनासंगॆं .. ५.. २३ काय उपचार करूं पांडुरंगा . हॆंचि मज सांगा विचारूनी .. १.. कॊणता पदार्थ उणा तुजपासी . बॊलाया वाचॆशीं मौन पडॆ .. २.. शंकर\-शॆषादि करिती स्मरण . तॆथॆं माझॆं मन गा{ऊं} शकॆ .. ३.. इंद्र सुरवर वाहती सुमनॆं . तॆथॆं म्यां वाहणॆ ं काय ऎक .. ४.. परीं आवडीनॆं जॊडूनी ऒंजळ . बुका वाहूं माळ तुळसीची .. ५.. उणॆं पुरॆं तुम्ही करूनियां सांगा . जिवालागीं मग सुख तॆव्हां .. ६.. तुका म्हणॆ माझी ऐकावी प्रार्थना . तुम्ही नारायणा सॆवकाची .. ७.. २४ कैसॆं करूं ध्यान कैसा पाहूं तुज . वर्म दावी मज याचकासी .. १.. कैसी भक्ति करूं सांग तुझी सॆवा . कॊण्या भावॆं दॆवा आतुडसी .. २.. कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं . जाणुं हा कवणूं कैसा तुज .. ३.. कैसा गा{ऊं} गीतीं कैसा ध्या{ऊं} चित्तीं . कैसी स्थिति मति न कळॆ मज .. ४.. तुका म्हणॆ जैसॆं दास कॆलॆं दॆवा . तैसॆं हॆं अनुभवा आणीं मज .. ५.. २५ काय तुज कैसॆं जाणावॆं गा दॆवा . आणावॆ अनुभवा कैशापरी .. १.. सगुण निर्गुण स्थूल कीं लहान . न कळॆ अनुमान मज तुझॆं .. २.. कॊणता निर्धार करूं हा विचार . भवसिंधु पार तारावया .. ३.. तुका म्हणॆ कैसॆं पाय आतुडती . न पडॆ श्रीपती वर्म ठावॆं .. ४.. २६ स्तुती करूं तरी कॊण माझी मती . वॆदां पडॆ भ्रांति हॆं आश्चर्य .. १.. परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी . बैसवीं लौकरी यातीगुण .. २.. रूप गुण कीर्ति कृपाळू उदार . वर्णावया पार ब्रह्मअ नॆणॆ ं .. ३.. रूपीं नामीं शिव हॊ{ऊ}निया वॆडा . वर्णिला पवाडा रामनामीं .. ४.. तुका म्हणॆ मज नॆणवॆचि शिव . नाहीं राहिला वाव बॊलावया .. ५.. २७ नामाचा प्रताप न वर्णवॆचि मज . सांग गरुडध्वज राहॆ तॆथॆं .. १.. मम वाचा किती परतल्या श्रुती . वॆद मुखॆं श्रुती मौन ठॆलॆ .. २.. वर्णूं नॆणॆं शॆष नामाचा पवडा . चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या .. ३.. अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी . पायांची किंकरी हॊ{ऊ}नि ठॆली .. ४.. तुका म्हणॆ आम्ही मानव किंकर . वर्णावया पार न कळॆ तुझा .. ५.. २८ आम्हीं मानवानी वर्णावॆं तॆं काय . सुरवर पाय वंदिताती .. १.. गणॆश शारदा करिती गायन . आदिदॆव गण श्रॆष्ठ श्रॆष्ठ .. २.. जयाच्या गायना तिष्ठतॊ शंकर . तयासी पैं पार न कळॆ तुझा .. ३.. तुका म्हणॆ आम्ही किंकर तॆ किती . इंद्राची ती मती नागविली .. ४.. २९ अगा महाविष्णु अनंत भुजांच्या . आम्हां अनाथांच्या सॊयरीया .. १.. न कळॆ महिमा वॆद मौनावती . तॆथॆं माझी मति कॊणीकडॆ .. २.. काय म्यां वर्णावॆं तुझ्या थॊरपणा . सहस्रवदना शक्ति नव्हॆ .. ३.. रविशशी जॆथॆं तॆजॆं सामावती . तॆथॆं माझी मती कॊणीकडॆ .. ४.. तुका म्हणॆ आम्ही बाळ तूं मा{ऊ}ली . करावी सा{उ}ली करुणॆची .. ५.. ३० नमॊ विश्वरूपा अगा मायबाप . अपारा अमूपा पांडुरंगा .. १.. विनवितॊ रंक दास मी सॆवक . वचन तॆं ऎक आ{इ}कावॆ .. २.. तुझी स्तुती वॆद करितां भागला . निवांतचि ठॆला नॆति नॆति .. ३.. ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन . वर्णितां तुझॆ गुण न सरती .. ४.. तुका म्हणॆ तॆथॆं काय माझी वाणी . जॆ तुझी वाखाणी कीर्ति दॆवा .. ५.. ३१ विनविजॆ ऐसॆ भाग्य नाहीं दॆवा . पायांशीं कॆशवा सलगी कॆली .. १.. धीटपणॆ पत्र लिहिलॆं आवडी . पार नॆणॆं थॊडी मति माझी .. २.. जॆथॆं वॆदां तुझा न कळॆचि पार . तॆथॆं मी अपार काय वानूं .. ३.. जैसॆ तैसॆ माझॆ बॊल अंगिकारी . बॊबड्या उत्तरी गौरवितॊ .. ४.. तुका म्हणॆ विटॆवरी जीं पा{ऊ}लॆं . तॆथॆं म्यां ठॆविलॆं मस्तक हॆं .. ५.. ३२ त्रिगुण आटीव वाचॆचा पसारा . पडॆल विचार सर्व रस .. १.. आदि मध्य अंतीं नाहीं अवसान . जीवनीं जीवन मिळुनी गॆलॆं .. २.. रामकृष्ण नाम माळ ही साजिरी . ऒंविली गॊजिरी कर्णीं मनी .. ३.. तुका म्हणॆ तनु झाली हॆ शीतल . आवडी सकळ ब्रह्मानंदॆं .. ४.. ३३ इतुकॆं करीं दॆवा ऐकॆं वचन . समूळ अभिमान जाळीं माझा .. १.. इतुकॆं करीं दॆवा आ{इ}कॆं हॆ गॊष्टी . सर्व समदृष्टी तुज दॆखॆं .. २.. इतुकॆं करीं दॆवा विनवितॊं तुज . संतचरण रज वंदी माथां .. ३.. इतुकॆं करी दॆवा आ{इ}कॆं हॆ मात . हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं .. ४.. भलतियां भावॆं तारी पंढरीनाथा . तुका म्हणॆ आतां शरण आलॊं .. ५.. .. इति श्रीतुकाराम हरिपाठ समाप्त ..
५ श्रीनिवृत्तिमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग
१ हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं . अखंड श्रीपती नाम वाचॆ .. १.. रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती . नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां .. २.. नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत . दुजीयाची मात नॆणॊ आम्ही .. ३.. निवृत्ति जपतु अखंड नामावळी . हृदयकमळीं कॆशीराज .. ४.. २ हरिविण चित्तीं न धरीं विपरीत . तरताती पतित रामनामॆं .. १.. विचारुनी पाहा ग्रंथ हॆ अवघॆ . जॆथॆं तॆथॆं सांग रामनाम .. २.. व्यासादिक भलॆ रामनामापाठीं . नित्यता वैकुंठीं तयां घर .. ३.. शुकादिक मुनि विरक्त संसारीं . रामनाम निर्धारीं उच्चारिलॆं .. ४.. चॊरटा वाल्मीकि रामनामीं रत . तॊही ऎक तरत रामनामीं .. ५.. निवृत्ति साचार रामनामी दृढ . अवघॆचि गूढ उगविलॆ .. ६.. ३ हरिमार्ग सार यॆणॆंचि तरिजॆ . यॆरवीं उभिजॆ संसार रथ .. १.. जपतां श्रीहरी मॊक्ष नांदॆ नित्य . तरॆल पैं सत्य हरि नामॆं .. २.. काय हॆं ऒखद नामनामामृत . हरिनामॆं तृप्त करी राया .. ३.. निवृत्ति साचार हरिनाम जपत . नित्य हृदयांत हरी हरी .. ४.. ४ ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी . हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी .. १.. नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला . द्वैताचा अबॊला तया घरीं .. २.. हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं . अखंड पर्वणी हरी जपतां .. ३.. निवृत्ति साकार हरिनाम पाठ . नित्यता वैकुंठ हरिपाठ .. ४.. ५ जपतां कुंटिणी उतरॆ विमान . नाम नारायण आलॆं मुखा .. १.. नारायण नाम तारक तॆं आम्हां . नॆणॊं पैं महिमा अन्य तत्त्वीं .. २.. तरिलॆ पतित नारायण नामॆं . उद्धरिलॆ प्रॆमॆं हरिभक्त .. ३.. निवृत्ति उच्चार नारायण नाम . दिननिशी प्रॆम हरी हरी .. ४.. ६ ऎक तत्त्व हरि असॆ पैं सर्वत्र . ऐसॆं सर्वत्र शास्त्र बॊलियलॆं .. १.. हरिनामॆं उद्धरॆ हरिनामॆं उद्धरॆं . वॆगीं हरि त्वरॆं उच्चारी जॊ .. २.. जपता पैं नाम यमकाळ कांपॆ . हरी हरी सॊपॆं जपिजॆ सुखॆं .. ३.. निवृत्ति म्हणॆ हरिनामपाठ जपा . जन्मांतर खॆपा अंतरती .. ४.. ७ गगनींचा घन जातॊ पैं वारॆन . अवचिता पतन अधॊपंथॆं .. १.. अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी . प्रपंचबॊहरी आपॊ{आ}प .. २.. निवृत्ति म्हणॆ जन हरीचॆं स्वरूप . कळाचॆं पैं माप हरिनाम .. ३.. ८ सृष्टीच्या संमता सुरतरु तरु . बॊलिला विस्तारु धर्मशास्त्रीं .. १.. नॆघॊं हॆं तरु प्रपंचपरिवारु . प्रत्यक्ष ईश्वरू पुरॆ आम्हा .. २.. निवृत्ति निवांत हरीच सॆवित . दॊ अक्षरीं उचित इंद्रिया .. ३.. ९ सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार . यॊग साचार जनीं इयॆ .. १.. न लगॆ मुंडण काया हॆं दंडणॆं . अखंड कीर्तन स्मरॆ हरी .. २.. शिव जाणॆं जीवीं रक्षला चैतन्य . हॆ जीवीं कारुण्य सदा भावीं .. ३.. गगनीं सूर्य तपॆ अनंत तारा लॊपॆ . ऎकची स्वरूपॆं आत्मा तैसा .. ४.. उगवला कळीं उल्हासु कमळीं . तैसा तॊ मंडली चंद्र लॆखा .. ५.. निवृत्तिमंडळ अमृत सकळ . घॆतलॆं रसाळ हरिनाम .. ६.. १० जयाचॆनि सुखॆं चळत पैं विश्व . नांदॆ जगदीश सर्वा घटीं .. १.. त्याचॆं नाम हरी त्याचॆं नाम हरी . प्रपंचबॊहरी कल्पनॆची .. २.. शांति त्याची नारी प्रकृति विकारी . उन्मनी बॊवरी हृदयांतु .. ३.. निवृत्तिदॆवीं साधिली राणीव . हरपलॆ भाव इंद्रियांचॆ .. ४.. ११ हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ . हरि दॆवॊ दॆवॊ आहॆ सत्य .. १.. हरी हरी वाचॆ ऐसॆं जपा साचॆं . नाहीं त्या यमाचॆ मॊहजाळ .. २.. हरीविण सार नाहीं पैं निर्धार . हरिविण पार न पाविजॆ .. ३.. निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं . हरि ऎक अंतरीं सर्वीं नांदॆ .. ४.. १२ ध्यान धरा हरी विश्रांति नामाची . विठ्ठलींच साची मनॊवृत्ति .. १.. ध्यानॆविण मन विश्रांतिविण स्थान . सूर्याविण गगन शून्य दिसॆ .. २.. नलगॆ साकार विठ्ठल मनॊवृत्ति . प्रपंच समाप्ति ती अक्षरीं .. ३.. निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन . करितां अनुदीन मन मॆळॆ .. ४.. १३ प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज . आम्हां बॊलता लाज यॆत सयॆ .. १.. काय करूं हरी कैसां हा गवसॆ . चंद्रसूर्य अंवसॆ ऎकसूत्र .. २.. तैसॆं करूं मन निरंतर ध्यान . उन्मनी साधन आम्हां पुरॆ .. ३.. निवृत्ति हरिपाठ नाम हॆंचि वाट . प्रपंच फुकट दिसॆ आम्हां .. ४.. १४ लटिका संसार वाढविसी व्यर्थ . विषयाचा स्वार्थ क्षणॆं करीं .. १.. नकॊ शिणॊं दुःखॆ का भरिसी शॊकॆं . ऎकतत्त्वॆं ऎकॆं मन लावीं .. २.. लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नॆ{ई} बाळी . अखंड वनमाळी हृदयवटी .. ३.. निवृत्ति चपळ राहिला अचळ . नाहीं काळ वॆळ भजतां हरी .. ४.. १५ कल्पना काजळी कल्पिलॆ कवळी . कैसॆनि जवळीं दॆव हॊय .. १.. टाकी हॆ कल्पना दुरित वासना . अद्वैत नारायणा भजॆं कां रॆ .. २.. मॊहाच्या जीवनीं नकॊ करूं पर्वणी . चिंती कां आसनीं नारायण .. ३.. निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु . कल्पना साचारु हरी झाला .. ४.. १६ मॊहाचॆनि दॆठॆं मॊहपाश गिळी . कैसॆनि गॊपाळीं सरता हॊय .. १.. मॊहाचॆनि मॊहनॆं चिंतितां श्रीहरी . वाहिजु भीतरीं अवघा हॊय .. २.. दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचॆं . मग या मॊहाचॆं मॊहन नाहीं .. ३.. निवृत्ति आगम मॊहन साधन . सर्व नारायण ऎका तत्त्वॆं .. ४.. १७ तिमिरपडळॆं प्रपंच हा भासॆ . झाकॊळला दिसॆ आत्मनाथ .. १.. हरीविण दुजॆं चिंतितां निभ्रांत . अवघॆंचि दिसत माया भ्रम .. २.. सांडूनि तिमिर सर्व नारायण . हॆंचि पारायण नित्य करी .. ३.. निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज . ऎकतत्त्व बीज नाम लाहॊ .. ४.. १८ प्रवृत्ति निवृत्ति या दॊन्ही जनीं . वनीं काज करुनी असती .. १.. नारायण नाम जपतांचि दॊन्ही . ऎकतत्त्वीं करणी सांगिजॆ गुज .. २.. आशॆचॆ विलास गुंफॊनिया महिमा . सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञानॆ .. ३.. निवृत्ति तत्त्वतां मनाचॆ मॊहन . नित्य समाधानॆं रामनामॆं .. ४.. १९ क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति . अवघी हॆ क्षिती ऎकरूपॆं .. १.. शांति दया पैसॆ क्षमा जया रूप . अवघॆची स्वरूप आत्माराम .. २.. निंदा द्वॆष चॆष्टा अभिमान भाजा . सांडूनियां भजा कॆशवासी .. ३.. निवृत्ति तिष्ठतु ऎकरूप चित्त . अवघींच समस्त गिळियॆलीं .. ४.. २० आम्ही चकॊर हरि चंद्रमा . आम्ही कळा तॊ पौर्णिमा .. १.. कैसा बाहिजु भीतरी हरी . बिंब बिंबला ऎक सूत्रीं .. २.. आम्ही दॆही तॊ आत्मा . आम्ही विदॆही तॊ परमात्मा .. ३.. ऐक्यपणॆं सकळ वसॆ . द्वैतबुद्धी कांहीं न दिसॆ .. ४.. निवृत्ति चातक इच्छिताहॆ . हरिलागीं बरॆं तॆं पाहॆ .. ५.. २१ ज्याचॆ मुखीं नाम अमृतसरिता . तॊचि ऎक पुरता घटु जाणा .. १.. नामचॆनि बळॆ कळिकाळ आपणा . ब्रह्मांडा यॆसणा तॊचि हॊय .. २.. न पाहॆ तयाकडॆ काळ अवचिता . नामाची सरिता जया मुखीं .. ३.. निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामॆ . नित्य परब्रह्म त्याचॆ घरीं .. ४.. २२ नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य . त्याचॆं शुद्ध पुण्य इयॆ जनीं .. १.. रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचॆ . दहन पापाचॆं ऎका नामॆं .. २.. ऐसा तॊ नित्यता पुढॆ तत्त्व नाम . नाहीं तयासम दुजॆं कॊणी .. ३.. निवृत्ति अव्यक्त रामनाम जपॆ . नित्यता पैं सॊपॆं रामनाम .. ४.. २३ अखंड जपतां रामनाम वाचॆ . त्याहूनी दैवाचॆ कॊण भूमी .. १.. अमृतीं राहिलॆ कैचॆं मरण . नित्यता शरण हरिचरणा .. २.. नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी . नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या .. ३.. निवृत्ति म्हणॆ सार रामनाम मंत्र . कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं .. ४.. २४ नाम नाहीं वाचॆ तॊ नर निर्दैव . कैसॆनि दॆव पावॆल तया .. १.. जपॆ नाम वाचॆं रामनाम पाठॆं . जाशील वैकुंठॆ हरी म्हणता .. २.. न पाहॆ पैं दृष्टीं कळिकाळ तुज . रामनाम बीज मंत्रसार .. ३.. निवृत्ति म्हणॆ नाम जपावॆं नित्यता . आपणचि तत्त्वतां हॊ{ई}ल हरी .. ४.. २५ नामाचॆनि बळॆं तारिजॆ संसार . आणिक विचार करूं नकॊ .. १.. नाम जप वॆगीं म्हणॆ हरी हरी . प्रपंच बॊहरी आपॊ{आ}प .. २.. नित्यता भजन दॆवद्विज करी . नाम हॆ उcचारि रामराम .. ३.. निवृत्ति जपतु राम राम वाचॆ . दहन पापाचॆं आपॊ{आ}प .. ४.. .. इति श्रीनिवृत्तिनाथ हरिपाठ समाप्त ..
इति पंचरत्न हरिपाठ समाप्त
उगमस्त्रोत: http://sanskritdocuments.org/